करोना व्हायरसची भीती आणि तुरुंगांमधील प्रमाणाबाहेरील गर्दी
जगभरात ५,५२,९४३ इतक्या करोना व्हायरस बाधित केसेस असून २५,०४५ इतके लोक आतापर्यंत मृत्युमुखी पडले आहेत. या महारोगाचे गांभीर्य लक्षात घेऊनच मागील आठवड्यापासून राज्यात संचारबंदी सुरू झाली. तसेच २४ मार्च २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. असे असताना मोठ्या प्रमाणावरील एक जमाव तुरुंगांमध्ये बंद आहे. तेथील प्रमाणाबाहेरील गर्दी ही आधीपासूनच एक गंभीर समस्या आहे.......